२८°C
THE NEWS VOICE 24
मुख्यपृष्ठ गडचिरोली महाराष्ट् देश राजकारण क्रीडा शिक्षण आरोग्य मनोरंजन व्हिडिओ गॅलरी शेती इतर

तालुका

व्हिडिओ गॅलरी ई-पेपर संपर्क
ठळक बातम्या ««
तेलंगणातील स्वस्त धान्य दुकानांमधून गरीबांसाठी उपलब्ध होणारा तांदूळ महाराष्ट्रात आणून त्याची बेकायदा विक्री गडचिरोली जिल्ह्यातील धबधबे पर्यटकांसाठी खुले, निसर्गप्रेमींची मोठी गर्दी गडचिरोली जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी – जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वाचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू तेलंगणातील स्वस्त धान्य दुकानांमधून गरीबांसाठी उपलब्ध होणारा तांदूळ महाराष्ट्रात आणून त्याची बेकायदा विक्री गडचिरोली जिल्ह्यातील धबधबे पर्यटकांसाठी खुले, निसर्गप्रेमींची मोठी गर्दी गडचिरोली जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी – जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वाचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू
गडचिरोली ⚡ ब्रेकिंग 📖 1 मिनिट वाचन

तेलंगणातील स्वस्त धान्य दुकानांमधून गरीबांसाठी उपलब्ध होणारा तांदूळ महाराष्ट्रात आणून त्याची बेकायदा विक्री

सिरोंचा-आसरअल्ली राष्ट्रीय महामार्गालगत मागील दहा ते बारा वर्षांपासून या तस्करीचे जाळे कार्यरत असल्याच्या तक्रारी असून, तहसील कार्यालयापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Umesh Bhau

Umesh Bhau

Reporter · 24 Aug 2026, 07:51 AM

📍 सिरोंचा 👁 5
शेअर करा:
💬 📘 ✖️

तेलंगणातून दररोज मोठ्या प्रमाणावर तांदूळ ऑटो, पिकअप, ट्रक, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांमधून सिरोंच्यात आणला जातो

गडचिरोली : तेलंगणातील स्वस्त धान्य दुकानांमधून गरीबांसाठी

उपलब्ध होणारा तांदूळ महाराष्ट्रात आणून त्याची बेकायदा विक्री करणारा कुख्यात तांदूळ तस्कर 'विरेन' पुन्हा एकदा सीमाभागात सक्रिय झाला आहे. सिरोंचा-आसरअल्ली राष्ट्रीय महामार्गालगत मागील दहा ते बारा वर्षांपासून या तस्करीचे जाळे कार्यरत असल्याच्या तक्रारी असून, तहसील कार्यालयापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तेलंगणातून दररोज मोठ्या प्रमाणावर तांदूळ ऑटो, पिकअप, ट्रक, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांमधून सिरोंच्यात आणला जातो बाजारात बारीक तांदळाला अधिक मागणी असल्याने या व्यवहाराला अलीकडील काळात मोठी चालना मिळाल्याची चर्चा आहे. सिरोंच्यातील अवैध साठवणूक केंद्रातून हा तांदूळ वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून नव्या ब्रँडच्या नावाने गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत पाठविला जात आहे.

या व्यवहाराचे प्रमुख केंद्र सिरोंचा-आसरअल्ली महामार्गालगत सर्व्हे क्रमांक ७१ मधील वनजमिनीवर असून येथे पत्र्याचे शेड, गोदाम, कामगारांच्या खोल्या आणि अन्य बांधकामे करण्यात आले आहे. या सर्व अवैध कारभाराचा प्रमुख तेलंगणातील कुख्यात तांदूळ तस्कर 'विरेन' असून तो गोदाम परिसरात गुंडांसह मुक्कामी असतो. मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू असल्यानंतरही विविध विभागात कारवाईच्या अधिकार क्षेत्रावरून संभ्रम असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, प्राणहिता पुलाजवळ बाजार समिती आणि वनविभागाचे तपासणी नाके आहेत. तेलंगणातून येणाऱ्या धान्यवाहू वाहनांची एनओसी, बिल, वजन आणि अन्य कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जाते का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ओव्हरलोड वाहनांचीही सर्रास वाहतूक होत असून, सामान्य शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करणाऱ्या परिवहन विभागाकडून या वाहनांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

'विरेन' याने सिरोंच्यासह तेलंगणातील कालेश्वर येथे मोठी मालमत्ता उभी केल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या मालमत्तेचा स्रोत आणि तांदळाच्या व्यवहारातील आर्थिक उलाढाल याची अधिकृत चौकशी झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. महसूल, वन, पुरवठा, बाजार समिती आणि परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने या प्रकरणाची चौकशी करावी. सर्व्हे क्रमांक ७१ मधील वनजमिनीची पाहणी करून अतिक्रमण आढळल्यास कारवाई करावी. तसेच तेलंगणातून येणाऱ्या प्रत्येक धान्यवाहू वाहनाची कागदपत्रे, एनओसी आणि मालाचा स्रोत तपासावा, अशी मागणी नगरसेवक सतिश राचर्लावार यांनी केली आहे. गडचिरोली : तेलंगणातील स्वस्त धान्य दुकानांमधून गरीबांसाठी

उपलब्ध होणारा तांदूळ महाराष्ट्रात आणून त्याची बेकायदा विक्री करणारा कुख्यात तांदूळ तस्कर 'विरेन' पुन्हा एकदा सीमाभागात सक्रिय झाला आहे. सिरोंचा-आसरअल्ली राष्ट्रीय महामार्गालगत मागील दहा ते बारा वर्षांपासून या तस्करीचे जाळे कार्यरत असल्याच्या तक्रारी असून, तहसील कार्यालयापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तेलंगणातून दररोज मोठ्या प्रमाणावर तांदूळ ऑटो, पिकअप, ट्रक, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांमधून सिरोंच्यात आणला जातो बाजारात बारीक तांदळाला अधिक मागणी असल्याने या व्यवहाराला अलीकडील काळात मोठी चालना मिळाल्याची चर्चा आहे. सिरोंच्यातील अवैध साठवणूक केंद्रातून हा तांदूळ वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून नव्या ब्रँडच्या नावाने गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत पाठविला जात आहे.

या व्यवहाराचे प्रमुख केंद्र सिरोंचा-आसरअल्ली महामार्गालगत सर्व्हे क्रमांक ७१ मधील वनजमिनीवर असून येथे पत्र्याचे शेड, गोदाम, कामगारांच्या खोल्या आणि अन्य बांधकामे करण्यात आले आहे. या सर्व अवैध कारभाराचा प्रमुख तेलंगणातील कुख्यात तांदूळ तस्कर 'विरेन' असून तो गोदाम परिसरात गुंडांसह मुक्कामी असतो. मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू असल्यानंतरही विविध विभागात कारवाईच्या अधिकार क्षेत्रावरून संभ्रम असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, प्राणहिता पुलाजवळ बाजार समिती आणि वनविभागाचे तपासणी नाके आहेत. तेलंगणातून येणाऱ्या धान्यवाहू वाहनांची एनओसी, बिल, वजन आणि अन्य कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जाते का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ओव्हरलोड वाहनांचीही सर्रास वाहतूक होत असून, सामान्य शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करणाऱ्या परिवहन विभागाकडून या वाहनांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

'विरेन' याने सिरोंच्यासह तेलंगणातील कालेश्वर येथे मोठी मालमत्ता उभी केल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या मालमत्तेचा स्रोत आणि तांदळाच्या व्यवहारातील आर्थिक उलाढाल याची अधिकृत चौकशी झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. महसूल, वन, पुरवठा, बाजार समिती आणि परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने या प्रकरणाची चौकशी करावी. सर्व्हे क्रमांक ७१ मधील वनजमिनीची पाहणी करून अतिक्रमण आढळल्यास कारवाई करावी. तसेच तेलंगणातून येणाऱ्या प्रत्येक धान्यवाहू वाहनाची कागदपत्रे, एनओसी आणि मालाचा स्रोत तपासावा, अशी मागणी नगरसेवक सतिश राचर्लावार यांनी केली आहे

Umesh Bhau

लेखकाबद्दल

Umesh Bhau

Reporter · Chamorshi · 1 बातम्या

🔗 संबंधित बातम्या

💬 टिप्पण्या (0)

🎤 आमचे रिपोर्टर

Mahesh Madkam

Gadchiroli

Ganesh Shelke

Gadchiroli

Suresh Bhore

Aheri

Priya Gadhwe

Sironcha

📱 सोशल मीडिया

Gadchiroli News

📧 न्यूजलेटर

ताज्या बातम्या मुफ्त थेट ईमेल मध्ये मिळवा.